मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (11:49 IST)

तालिबानींची क्रूरता : हेलिकॉप्टरला प्रेत टांगून फिरवलं, सत्य जाणून घ्या

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी आल्यानंतर तालिबानने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. देशातील दुसरे सर्वात मोठे शहर कंधार येथे तालिबानच्या मालकीचे अमेरिकन हेलिकॉप्टर त्याच्या लढाऊ लोकांनी  उडवताना पाहिले आहे. याशिवाय, तालिबानच्या लढाऊंनी एका व्यक्तीला ठार मारले आणि त्याचे प्रेत हेलिकॉप्टरला लटकवले आणि बराच काळ उडत राहिले.तालिबानच्या क्रूरतेचा हा व्हिडिओ अनेकांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तालिबानी लढाऊ हे हेलिकॉप्टर कंधारमध्ये गस्तीसाठी वापरत आहेत. 
 
व्हिडीओ फुटेजमध्ये एका व्यक्तीचे प्रेत अमेरिकन लष्कराच्या हेलिकॉप्टरवरून लटकलेला दिसत आहे. व्हिडिओ जमिनीवरून शूट करण्यात आला आहे,त्यामुळे हेलिकॉप्टरला बांधलेला माणूस जिवंत होता की नाही हे कळू शकले नाही. पण तालिबानने एका माणसाची हत्या करून त्याला दोरीच्या मदतीने हेलिकॉप्टरमधून फाशी दिल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना एका ट्विटर अकाऊंटने लिहिले आहे की, हे आमचे हवाई दल आहे, जे कंधारमध्ये गस्त घालत आहे. हे ट्विटर अकाउंट तालिबानशी जोडल्याचा दावा केला जात आहे सोमवारी अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबान लढाऊंनी काबूलच्या विमानतळावरही कब्जा केला आहे.तालिबानने अमेरिकन सैन्याच्या माघारीला विजय म्हटले आहे आणि जगभरातील आक्रमकांसाठी हा धडा असल्याचे म्हटले आहे.