शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑगस्ट 2021 (12:20 IST)

अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला

कंधारअमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतल्यापासून देशात हल्ले सातत्याने वाढत आहेत. कंधार विमानतळावर रविवारी पहाटे रॉकेटने हल्ला केला गेला.
 
दुसरीकडे, तालिबानने अफगाणिस्तानच्या कंधार प्रांतातील स्पिन बोल्डक जिल्हा ताब्यात घेतल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्येसह मालमत्तेची लूट सुरू केली आहे.
 
अफगाणिस्तानची राष्ट्रीय मानवाधिकार संस्था, अफगाणिस्तान इंडिपेंडेंट ह्यूमन राइट्स कमिशन (AIHRC) यांनी सांगितले की,तालिबानची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि मानवतावादी कायद्याच्या तत्त्वांशी व्यावहारिक बांधिलकी नाही.
 
शनिवारी,अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये तालिबानच्या झपाट्याने वाढत्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या दरम्यान देशाच्या प्रमुख राजकीय नेत्यांनी राष्ट्रपती अशरफ घनी यांची एकता दाखविण्यासाठी मुलाखत घेतली.