शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रशिया , सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:29 IST)

टीव्ही निवेदक अँकरने घातली मैत्रिणीला लग्नाची मागणी

लोकांना सांगण्यासारख्या रंजक बातम्या नसल्यामुळे एका टीव्ही निवेदकाने चक्क आपल्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घातल्याचा प्रकार रशियात घडला आहे. “ज्वेज्दा टीव्ही’ या वाहिनीत शुक्रवारी हा प्रकार घडला. या वाहिनीवर डेनिस हा निवेदक बातम्या देत होता आणि त्याच्याकडे फारशा मसालेदार बातम्या नव्हत्या. त्यामुळे त्याने थेट प्रक्षेपणात मैत्रिणीला मागणी घालायचे ठरवले.
 
आपली गर्लफ्रेंड कार्यक्रम बघत असणार, हे डेनिसला माहीत होते. त्यामुळे तो जागेवरून उठला, स्टुडियोत फिरला आणि खिशातून लाल रंगाची एक डबी काढली. त्यानंतर तो गुडघ्यावर बसला.
 
कॅमेऱ्याकडे पाहत तो म्हणाला, आमच्याकडे चांगल्या बातम्या नाहीत. त्यामुळे मी आमच्याकडून एक चांगली बातमी देऊ इच्छितो. मार्गरीटा स्टेपानोव्हा, तू माझ्याशी लग्न करशील का? मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन आणि तू हो म्हणशील, अशी मला आशा आहे. डेनिसच्या मैत्रिणीने होकार दिल्याची माहिती ज्वेज्दा टीव्हीने एका रशियन सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर दिली आहे. विशेष म्हणजे ज्वेज्दा टीव्ही ही वाहिनी रशियाचे संरक्षण मंत्रालय चालविते.