1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Russia will give the most modern weapon to help India

रशिया करणार भारताला मदत सर्वात आधुनिक शस्त्र देणार

रशिया आणि भारताची मैत्री सर्वश्रुत आहे. अमेरिका नेहमीच दोघांच्या मैत्रीवर लक्ष ठेवते. तर चीनला रशिया सोबत आपले सबंध नको आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत असून, भारतासोबत एस ४०० क्षेपणास्त्र शोध यंत्रणेच्या खरेदीचा करार होणार आहे. करारामुळे जगातली सर्वात अत्याधुनिक अशी क्षेपणास्त्र शोध यंत्रणा भारताला मिळणार आहे. त्यासाठी ५ अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करण्यात येणार आहेत. आधुनिक शस्त्र  यंत्रणेत ४०० किलोमीटर अंतरावरून एकाच वेळी येणाऱ्या अनेक क्षेपणास्त्रांचा शोध  घेऊन त्यांना खाली पाडण्यासाठी हल्ला करण्याची सोय़ आहे. या खरेदी कराराबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. पुतीन आणि मोदींच्या भेटी दरम्यान दोन्ही सरकारचे प्रतिनिधी करारावर सह्या करणार आहेत. पुतीन यांचे जवळचे परराष्ट्र सल्लागार युरी उषेगाव्ह यांनी मोस्कोत माहिती  दिली आहे. यामुळे सीमेवर भारताला नवीन ताकद मिळणार असून यामुळे सैन्य प्रभावीपणे काम करू शकणार आहे.
पुढील लेख
नशेबाज मुलींचा मुंबईत गोंधळ उगारला पोलिसांवर हात