मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By

तवा पनीर

साहित्य : 200 ग्रॅम पनीर, 1 कांदा, 2 टोमॅटो, 4-5 ढोबळी मिरची, 1/4 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1/4 चमचा जिरे पूड, 1/4 चमचा धने पूड, 1/4 चमचा आमचूर पूड, मीठ, तेल. 
 
कृती : पनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल घालून पनीरचे तुकडे भाजून घेणे. त्याच तेलात कांदा, गुलाबी रंगावर भाजून घेणे, त्याच तेलात ढोबळी मिरची भाजून बाजूला ठेवणे. आता त्याच तेलात टोमॅटो घालून पूर्णपणे शिजवणे. त्यात तिखट, हळद, जिरे पूड, धने पूड आणि आमचूर पूड घालून 2-3 मिनिट परत शिजवणे. त्यात पनीर, कांदा, ढोबळी मिरची आणि मीठ घालून चांगले एक‍त्र करणे व 4-5 मिनिट शिजवून गरम गरम सर्व्ह करावे.