रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

मिश्र डाळींचे कटलेट

साहित्य : भिजलेले मूग, मटकी व मसूर मोड आलेले प्रत्येकी अर्धी वाटी, पाव वाटी हिरवे वाटाणे, दोन बटाटे उकडून कुस्करून, हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे, 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा तिखट, मीठ चवीनुसार, 1 चमचा चाट मसाला, चिमूटभर साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ब्रेडचा चुरा, तेल.

कृती : कडधान्ये वाफवून घ्या व मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात कुस्करलेला बटाटा, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण, तिखट, मीठ, चाटमसाला, साखर कोथिंबीर घाला. एकत्र कालवून गोळा बनवा. ताटात ब्रेडचा चुरा पसरा. मिश्रणाचे लहान लहान गोळे करून त्याला हाताने चपटे करा व ब्रेडच्या चुऱ्यावर त्यांना गुंडाळून घ्या. पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यावर टिक्क्या ठेवा. दोन्ही बाजूंनी थोडे तेल सोडून खमंग भाजा. टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.