मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

Garlic Chicken गार्लिक चिकन

garlic chicken
साहित्य : १ किलो चिकन, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ ते ४ लसूणचे कांदे, ४०० ग्रॅम दही, चिकन मसाला, गरम मसाला, हळद, कसूरी मेथी, काश्मिरी मिर्च पावडऱ चवीनुसार मीठ.

कृती : प्रथम चिकनला मीठ चोळून स्वच्छ धुवून घ्या. लसूण बारीक चिरून घ्या. एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही एक चमचा तेल़, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे. नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मेरिनेटेड चिकन घालावे व मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे. गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कसूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या. चिकनच्या तुकडयांना स्पर्श न करता चमच्याने ग्रेव्ही थोडी ढवळा व गॅस बंद करा.