शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (14:58 IST)

अमृतसरी चिकन मसाला रेसिपी, बोटं चाटत राहाल

अमृतसरी चिकन मसाला रेसिपी एक अतिशय लोकप्रिय पंजाबी डिश आहे. जी रोटी, भात किंवा नान सोबत सर्व्ह केली जाते. ही डिश बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला चविष्ट आहे. ज्या लोकांना नॉनव्हेज आवडते त्यांना ही रेसिपी खूप आवडेल. चला तर मग जाणून घेऊया ही टेस्टी अमृतसरी चिकन मसाला रेसिपी- 
 
मॅरीनेशन साठी-
-500 ग्राम चिकन
-2 टी स्पून आलं- लसूण पेस्ट
-3 टेबल स्पून दही
-1 टी स्पून लिंबाचा रस
-1 टी स्पून व्हिनेगर
-1 टी स्पून धणेपूड
-1 टी स्पून जिरपूड
-1 टी स्पून लाल तिखट
-1 टी स्पून मीठ
-2 टी स्पून कांदा (चिरलेला)
 
ग्रेवी साठी -
-2 टी स्पून लोणी
-1 टी स्पून लाल तिखट
-1 टी स्पून धणेपूड
-1 टी स्पून जिरपूड
-1 टी स्पून आलं
-1/2 कप पाणी
-1 टी स्पून मीठ
-1 हिरवी मिरची
-6 टॉमेटो
-1/2 टी स्पून साखर
-3 टी स्पून लोणी 
-3 टी स्पून क्रीम
 
मॅरीनेट करण्याची पद्धत-
चिकन मॅरीनेट करण्यासाठी प्रथम चिकन एका मोठ्या भांड्यात घ्या आणि त्यात आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, व्हिनेगर, धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट, मीठ आणि चिरलेला कांदा घाला. या सर्व गोष्टी चिकनमध्ये नीट मिसळा आणि 2 तास बाजूला ठेवा.
 
चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी-
चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये बटर टाकून गरम करा. त्यात लाल तिखट घालून हलके परतून घ्या. आता त्यात धणेपूड, जिरेपूड आणि चिरलेले आले घालून चांगले परतून घ्या. त्यात पाणी घालून मसाले चांगले मिसळा. आता त्यात मीठ, हिरवी मिरची, टोमॅटो आणि साखर घालून मिक्स करून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये बटर घ्या आणि पॅनमध्ये सगळीकडे पसरवा, आता त्यात मॅरीनेट केलेले चिकन घाला.
 
चिकन बटरने चांगले तळून घ्या, पॅन झाकून चिकन शिजवा. यानंतर तव्याचे झाकण काढून चिकनचा रंग सोनेरी तपकिरी झाला आहे की नाही ते तपासा. आता त्यात टोमॅटोची ग्रेव्ही घालून मिक्स करा. 
 
पॅन पुन्हा झाकून ठेवा, आणखी काही वेळ चिकन शिजवा. झाकण काढा आणि ग्रेव्हीमध्ये क्रीम घाला आणि चांगले मिसळा. आता त्यावर बटर, हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून सजवा आणि गरमागरम चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करा.