शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. नवरात्र रेसिपी
Written By

उपवासाची शेंगदाणा आमटी Upvasachi Shengdana Amti

upvasachi amti
साहित्य 
१ वाटी दाण्याचे कूट
३-४ हिरव्या मिरच्या
२-३ आमसुले
चवीप्रमाणे मीठ
साखर किंवा गूळ
२ लवंगा
१ दालचीनीचा तुकडा
 
कृती
दाण्याचे कूट थोडे पाणी घालून मिरच्या, लवंगा, दालचिनी यांच्यासोबत पाटयावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करा. मीठ, आमसुले व साखर घाला. नंतर आमटी उकळण्यास ठेवा. तुपात जिर्‍याची फोडणी करुन आमटीत घाला.
 
टीप: आपण आमसुले याऐवजी ताक किंवा दही देखील वापरु शकता.