sabudana idli साबुदाणा इडली
साहित्य-
200 ग्रॅम साबुदाणा
250 ग्रॅम वरीचे तांदूळ
200 ग्रॅम दही
चवीनुसार मीठ
बेकिंग सोडा
तूप
जिरे
पाणी
कृती
साबुदाणा आणि वरीचे तांदूळ वेगवेगळे मिक्सरमधून वाटून घ्या. नंतर ते मिश्रण एकत्र करा आणि त्यात दही, मीठ, जिरं घालून पाण्याने भिजवून साधारण एक ते दोन तास भिजवून ठेवा. पीठ भिजल्यावर त्यात अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घाला. त्यानंतर इडली पात्राला तूप लावा आणि त्यावर हे मिश्रण घाला. इडली वाफवून घ्या. खोबऱ्याच्या चटणीसह सर्व्ह करा. आपण यात आपल्या आवडीप्रमाणे गाजर, कोथिंबीर, मिरची आणि भाजलेल्या दाण्याचा कूट देखील घालू शकता.