गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

Sabudana Puri उपवासाची साबुदाणा पुरी करण्याच्या दोन सोप्या पद्धती

subudana puri
साहित्य : एक वाटी साबुदाणा(भिजवलेला), एक वाटी शिंगाड्याचे पीठ, दोन उकडलेले बटाटे, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, सैंधव मीठ, काळेमिरेपूड चवीप्रमाणे, थोडं शेंगदाण्याचे तेल किंवा तूप.
 
कृती :
पहिली पद्धती : बटाट्यांना कुस्करून घेऊन शिंगाड्याचे पीठ मिसळा. बाकी सर्व जिन्नस देखील मिसळून घ्या. लागत लागत पाणी घालत कणकेसारखे मळून घ्या. आता हातावर पाणी लावून बारीक बारीक गोळ्या करून त्याला पुरीचा आकार द्या. तव्यावर तेल सोडा आता या पुरीला पराठे शेकतो त्या प्रमाणे शेकून घ्या. चांगल्या प्रकारे शेकून झाल्यावर दह्या बरोबर सर्व्ह करा.
 
दुसरी पद्धती : जर आपल्याला या पिठाच्या पुऱ्या बनवायचा असल्यास एका कढईत शेंगदाण्याचे तेल  किंवा तूप गरम करण्यास ठेवा आता या पुऱ्यांना त्या तेलात किंवा तुपात खरपूस तळून घ्या आणि दह्याच्या रायतं किंवा हिरव्या चटणी सोबत गरम गरम सर्व्ह करा.