गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (15:17 IST)

Puran Poli पुरण तयार करण्यासाठी खास टिप्स

puran poli
पुरण तयार करण्यासाठी चणाडाळ भिजत घातली जाते. अशात डाळ ज्या पाण्यात भिजवली आहे ते पाणी काढून नवीन पाण्यात डाळ शिजवावी.
डाळ चांगली शिजणे फार गरजेचे असते.
पुरण शिजताना जर तुम्ही गुळाचे खडे घातले तर गूळ वितळायला वेळ लागेल त्यामुळे गूळ किसून घालावा.
पुरण नेहमी मंद आचेवर शिजवावं.
पुरण पोळी लाटताना काळजी घ्यावी. जर पोळी जरा तुटली तर त्या भागामध्ये फक्त थोडे कोरडे पीठ घालावे. 
 
पुरण पोळी रेसिपी
साहित्य- 
1 कप गव्हाचे पीठ
1 कप मैदा
3 चमचे तेल
1 कप चणा डाळ
1 कप गूळ किंवा साखर
1/2 चमचे जायफळ पावडर
 
कृती- 
चणा डाळ पाच ते सात तास भिजवून नंतर धुऊन शिजवून घ्याव. गाळनीच्या सहाय्याने जास्त झालेलं पाणी काढावं नंतर डाळ वाटून घ्यावी. गॅसवरपूरण शिजवायला ठेवावं आणि त्यात गूळ किंवा साखर मिसळून मध्यम आचेवर शिजवावं. त्यात जायफळ पावडर घालावी. सतत ढवळून पूरण घट्ट होईस्तोवर शिजवावं. नंतर पुरण गार होण्यासाठी ठेवून द्यावं.
 
आता परातीत गव्हाचे पीठ मैद्याच्या चालणीने चालून घ्यावं. त्यात मैदा घालून एकत्र चांगले मिसळावं. मोहन घालावं. एका वेळी थोडेसे पाणी घालून एकदम मऊ पीठ तयार करावं. तेल लावून कणीक मळून घ्यावी. पीठ किमान दोन तास झाकून ठेवावं.
 
नंतर कणिकच्या मध्यम आकाराचा गोळा करुन त्याला लाटून त्यात पुरणाचं स्टफिंग भरावं. हळूवार चारी बाजूने बंद करुन पोळी लाटून घ्यावी. मध्यम आचेवर तवा गरम करुन पोळी भाजून घ्यावी. वर पलटून थोडे तूप लावावं.
 
पुन्हा पोळी पलटी करा आणि तूप पुन्हा दुसर्‍या बाजूला पसरवून घ्यावं. दोन्ही बाजूंनी पोळी भाजून झाल्यावर गरमागरम वरुन साजूक तूप घालून सर्व्ह करावी.