1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2023 (22:32 IST)

Anarasa Recipe : अधिक मासासाठी बनवा चविष्ट खमंग अनारसे

Anarasa Recipe :पारंपरिक पद्धतीने तुम्ही अनारसे बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अनारश्यांची ही रेसिपी नक्की ट्राय करायला हवी. चला तर जाणून घेऊया अनारसे साहित्य आणि कृती 
 
साहित्य - दीड वाटी तांदूळ, अर्धा वाटी साखर, तळण्यासाठी तूप, खसखस.
 
कृती - तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढी पीठी साखर पिठात मिसळवून घ्या. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. 3-4 दिवसांनी अनारश्यांचे पीठ तयार होते. अनारसे करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या. त्यात मॅश केलेली केळी अगदी लगत्या प्रमाणात घालून पीठ मळा. नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या. नंतर मंद आचेवर तळून घ्या. 
 
 
Edited By- Priya Dixit