मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

भुट्याचे कटलेट

साहित्य : १ किलो भुट्टे (कणस), चार उकळलेले बटाटे, ५० गॅम रवा, ३ हिरव्या मिरच्या, १ चमचा धने पूड, कोथिंबीर कापलेली, १ चमचा आमचूर, मीठ, २५० ग्रॅम तेल.

 कृती : भुट्ट्याला किसून घेऊन त्यात रवा, बटाटे, धणे पूड, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, सर्व मसाले व मीठ घालून चांगले कालवावे. कढई गरम करून त्यात तेल टाकून मिश्रणाला कटलेटचे आकार देऊन गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावे. हे कटलेट चटणी सोबत सर्व्ह करावे.