गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

मटण मश्रुम

साहित्य : 750 ग्रॅम मटण, 2 चमचे धणे पूड, 500 ग्रॅम बटाटे, 1/4 कप तूप, 250 ग्रॅम लहान मश्रुम, 1 चमचा काळे मिरे पूड, चवीनुसार मीठ.

कृती : मटणाला स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावे. बटाटे कापून वेगळे ठेवावे. अर्ध तूप घेऊन ते गरम करावे व त्यात बटाटे फ्राय करून घ्यावे. बाकी उरलेल्या तुपात मटणाचे तुकडे वेगळे फ्राय करून ठेवावे. मश्रुमला स्वच्छ करून त्याचे काप करून वेगळे ठेवावे.

एका पॅनमध्ये मश्रुम व मटण एकत्र करून मंद आचेवर ठेवावे. काळे मिरे आणि मीठ टाकावे. वरून फ्राय केलेले बटाटे व धणे पूड घालून झाकण ठेवावे. 45 मिनिटापर्यंत शिजू द्यावे व सर्व्ह करताना ग्रीन सलाडाबरोबर द्यावे.