शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

मालवणी बोंबील फ्राय

साहित्य : 10-12 बोंबील, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट, मीठ, तांदळाचा बारीक रवा, तेल. 
 
कृती : सर्वप्रथम बोंबील डोक्याकडून कापून घेऊन उभा चिरून काट्याकडून फ्लॅट करून घ्यावा. धुऊन मीठ लावून ठेवावा. नंतर दाबून सर्व पाणी काढून टाकावे. त्यास हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, थोडं तेल घालून लावावं. तेल लावल्याने मसाला बोंबिलाला व्यवस्थित लागतो. गॅसवर तवा ठेवून गरम झाल्यावर तेल घालावे व गरम तेलात बोंबील रव्यात घोळवून त्यावर टाकावा. नंतर गॅस कमी करून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यावा.