शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

बहुउपयोगी कुकरी टिप्स

जर एकदा शिजलेली भाजी किंवा चुरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवले असेलतर ते बाहेर काढावे. सारखे-सारखे बाहेर काढणे आणि ठेवणे यामुळे खाद्य सामुग्री खराब होते. 
 
मीठदाणीत मीठ नेहमी चिटकत असते. झाकण लावण्याआधी त्यात तीन-चार दाणे तांदुळाचे टाकावे म्हणजे चिटकत नाही. 
 
उरलेली खाद्य पदार्थ फ्रिजमध्ये ठेवताना भांड्याचे तळवे पुसून घ्यावे. नाहीतर फ्रिज तर खराब होईलच, तळात लागलेली घाण अन्य दुसर्‍या खाद्य पदार्थात पडेल .
 
फ्रिजमध्ये सर्व खाद्य सामुग्रीला झाकून ठेवावे, कारण त्यामुळे एका वस्तुचा गंध दुसर्‍या वस्तुत जाईल. 
 
फ्रिजमध्ये बर्फाची ट्रे झटक्याने अथवा कोणत्याही धारदार वस्तुनी काढावी नाही. ट्रे खाली ग्लिसरीन लावले तर, ते सहजपणे निघते. 
 
कुकिंग गॅसला सिरके किंवा मीठाच्या पाण्याने साफ करावे. म्हणजे ते चमकतील आणि तिथे किडेही राहणार नाही.