चिकन बिर्याणी
साहित्य : 650 ग्रॅम चिकनचे तुकडे, दीड कप बासमती तांदूळ, 2 मोठे चमचे तेल, 1 कापलेला कांदा, 2 पाकळ्या लसूण, 1 हिरवी मिरची कापलेली, 1 तुकडा अद्रक, 2 चमचा चिकन मसाला, 1 चमचा मीठ (चवीनुसार), 1/2 चमचा गरम मसाला, 3 कापलेले टोमॅटो, 1/2 चमचा हळद, 2 तेजपान, 4 लहान वेलची, 4 लवंगा, 1 चमचा केसर.
कृती : तांदूळ धुऊन अर्था तास पाण्यात भिजवावे. एक पॅनमध्ये तेल गरम करून कांदे परतून घ्यावे. नंतर लसूण, आलं व हिरवी मिरची टाकून फ्राय करावे. चिकन टाकून पाच मिनिट फ्राय करावे. चिकन मसाला, मीठ आणि गरम मसाला घालून पाच मिनिट फ्राय करावे नंतर टोमॅटो घालून तीन-चार मिनिट आणखी भाजावे नंतर उतरवून एकीकडे ठेवावे. दुसऱ्या सॉस पॅन मध्ये तांदूळ, तीन कप पाणी, हळद, तेजपान, वेलची आणि केसर घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. शिजून झालेला भातात चिकन हळूच मिसळावे आणि कमी आंचेवर आठ-दहा मिनिट शिजवून आंच विझवावी व आठ-दहा मिनिटानंतर वाढावे.