मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राइक, राजनाथ सिंह यांचे संकेत

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराने दोन-तीन दिवसांपूर्वी सीमेवर सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई केल्याचे संकेत दिले आहे. असे काही घडले असून लवकरच याची माहिती मिळेल, असेही ते म्हणाले. 
 
मुजफ्फरपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे संकेत दिले. पाककडून आपल्या जवानांसोबत चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या आणि आपल्या सैन्यासोबत क्ररता सहन केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मी आपल्या जवनांना सांगितले आहे की पहिल्यांदा गोळी झाडू नका परंतू तिकडून गोळी आली तर मात्र आपल्या गोळ्या माजू नका, असे राजनाथ सिंह पाकिस्तानच्या कृतीवर टीका करताना म्हणाले.