बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

एडल्टरीवर ऐतिहासिक निर्णय, कलम 497 रद्द, व्यभिचार गुन्हा नाही

सर्वोच्य न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे 150 जुने कलम 497 रद्द झाले आहे. यासोबतच कोर्टाने म्हटले की व्यभिचार गुन्हा नाही. याप्रमाणे आता विवाहाबाहेर शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा नाही. उल्लेखनीय आहे की दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने 9 ऑगस्ट रोजी 497 वर सुनावणी करत आपला निर्णय सुरक्षित राखला होता.
 
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
पती हा पत्नीचा मा‍लक होऊ शकत नाही.
सेक्शन 497 सन्मानाने जगण्याचा हक्काविरुद्ध आहे.
महिलांसोबत असमान व्यवहार करणारा प्रावधान संवैधानिक नाही: सीजेआय
संविधानाची सुंदरता त्यात मी, माझा आणि तुम्ही सर्व सामील असणे आहे: सीजेआय दीपक मिश्रा
एखाद्या पुरुषाद्वारे विवाहित महिलेसोबत संबंध ठेवणे गुन्हा नाही.
संविधान खंडपीठाने कलम 497 ला बेकायदेशीर ठरवले.
 
काय आहे कलम 497?
कलम 497 प्रमाणे विवाहित पुरुष विवाहित महिलेसोबत तिच्या इच्छेने संबंध स्थापित केल्यावरही महिलेचा पती एडल्टरी नावाखाली पुरुषाविरुद्ध तक्रार नोंदवू शकतो. परंतू आपल्या पत्नीविरुद्ध कारवाई करू शकत नव्हता. या व्यतिरिक्त त्या पुरुषाची पत्नीदेखील त्या महिलेविरुद्ध कारवाई करू शकत नव्हती. कलम 497 मध्ये केवळ हा प्रावधान आहे की पुरुषाविरुद्ध तिच्या साथीदाराचा पती तक्रार नोंदवू शकत होता.