आज पुन्हा महाराष्ट्र बंद
आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवार, 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चांनही 24 जुलैला महाराष्ट्र बदं केला होता. आजच्या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले आहे. पुणे आणि औरंगाबादेत शाळांना सुट्टी देणत आली आहे.
मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांदरम्यान बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला उाच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार लोकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगत या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा आणि या शहरांमध्ये केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्यात गेल्या 21 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते.