गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (16:56 IST)

रशियामध्ये लवकरच कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करणार

Russia
रशियाने करोना व्हायरसविरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली होती. रशियाने येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याच महिन्यात १० तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.
 
गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून रजिस्ट्रेशनसाठी पेपरवर्क सुरु आहे असे रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्कोव यांनी सांगितले.