मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (15:01 IST)

Monsoon Tips: पावसाळ्यात भिजल्यानंतर ताजेपणा हवा असल्यास अंघोळीच्या पाण्यात हे मिसळा

पावसाळ्यात भिजल्यावर आपल्या त्वचे वर आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होतोच. त्वचेशी निगडित अनेक समस्या उद्भवतात, जसे अंगावर पुरळ येणं. अंग ओलं असल्यामुळे खाज- खरूज सारख्या समस्या सामोरी येतात. म्हणूनच आपल्याला पावसाळ्यात भिजल्यावर अंघोळ करणे आवश्यक आहे. याच बरोबर आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यात काही अश्या गोष्टी मिसळू शकता जे आपणास ताजेपणा देईल, त्याच बरोबर त्वचेला फायदेशीर देखील होईल. चला जाणून घेऊ या.
 
1. कडुलिंब बाथ - जर आपल्याला त्वचेशी निगडित समस्या जाणवत असतील तर कडुलिंब बाथ घेणे गरजेचे आहे. हे विशेषतः त्यांचा साठी उपयुक्त आहे ज्यांचा अंगावर फोड किंवा पिंपल्स होण्यासारख्या समस्या उद्भवतात. या साठी कडुलिंब आणि पुदिन्याची पानं उकळवून त्या पाण्याला थंड करून त्या पाण्याने अंघोळ करा.
 
2. गुलाब पाणी आणि लिंबू - गुलाब पाणी आणि लिंबाच्या रसाचे काही थेंबा आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने अंघोळ करा. असे केल्यास आपल्याला ताजं तवान वाटेल.
 
3. डियोबाथ - पावसाळ्यात जास्तवेळ ओले राहून किंवा ओले कापडं घालून शरीरातून वास येऊ लागतो. या पासून बचाव करण्यासाठी आपण 1 बादली पाण्यात मीठ आणि 1 चमचा डियो मिसळून याने अंघोळ करा. दिवसभर आपल्याला ताजेपणा जाणवेल. त्याच बरोबर शरीरातून दिवसभर एक मंद-मंद सुवास येईल.
 
4. जुईची फुले : जुईच्या फुलांना बाथ टब मध्ये टाकून ठेवावं आणि या पाण्याने अंघोळ करावी या मुळे आपल्याला दिवसभर ताजेपणा वाटतो आणि त्याच बरोबर आपले शारीरिक आणि मानसिक ताण देखील दूर होण्यास मदत मिळते.