नाचू सारे पावसात, आठवू दिस बालपणाचे.!
घेऊनी थेंब टपोरे, आल्या मृग धारा,
तप्त धरित्रीस आला ओला शहारा,
निःसंकोच तो ही बरसला, मनमुरादपणे!
पाऊस पडला लयीत, झाले सुरेल गाणे,
तृप्त झाले तरुवर सगळे, डोलू लागले,
पाणी ओढे होऊन छोटे, वाहू पहा लागले,
स्वागत करू या आपण ही सारे ह्याचे,
नाचू सारे पावसात, आठवू दिस बालपणाचे.!
- अश्विनी थत्ते