सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 मार्च 2018 (09:16 IST)

पाकिस्तान : पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ ची निवड

पाकिस्तानच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ आणि ‘बाहुबली’सह एकूण नऊ भारतीय सिनेमांची निवड करण्यात आली आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. कराचीमध्ये 29 मार्च ते 1 एप्रिल पहिल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये एकमेव मराठी सिनेमा ‘सैराट’ सह एस.एस. राजामौलीचा बाहुबली, डिअर जिंदगी, आखों देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, निलबटे सन्नाटा, साँग्स ऑफ स्कॉरपियन्स दाखवले जाणार आहेत.

राजामौली यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “बाहुबलीच्या निमित्ताने मला जगभ्रमंतीची संधी मिळाली. त्यातही सर्वांमध्ये पाकिस्तानची भेट विशेष संस्मरणीय असेल. पाकिस्तानच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकडून मिळालेल्या निमंत्रणाबद्दल आभारी आहे.”