शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (21:27 IST)

Salman Rushdie Attacked: लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रमा दरम्यान स्टेजवर चाकूने हल्ला

Salman Rushdie Attacked In US:  लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान स्टेजवर सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने सलमान रश्दी यांनाही धक्काबुक्की केली. या कार्यक्रमात रश्दी यांचे व्याख्यान होणार होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान रश्दी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
कार्ल लेवन या प्रत्यक्षदर्शीने सलमान रश्दीला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे ट्विट केले आहे. सुरक्षा दलांनी हल्लेखोराला पकडण्यापूर्वी रश्दी यांच्यावर अनेक वेळा वार करण्यात आले होते. त्यानंतर प्रेक्षकांमधील काही सदस्य मंचावर गेले. 
 
भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकाबाबत धमक्या आल्या आहेत. या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे कारण त्यावर इस्लाम धर्माची निंदा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याने त्याच्या डोक्यावर बक्षीसही ठेवले होते.