सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (19:53 IST)

Russia-Ukraine War:युक्रेनच्या निप्रोपेत्रोव्स्क येथे रशियाच्या हल्ल्यात 13 नागरिक ठार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला 1 अब्ज डॉलरची लष्करी मदत जाहीर केल्यानंतर रशियाने मध्य युक्रेनवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. रशियन हल्ल्यात किमान 13 नागरिकांचा मृत्यू झाला, असे एएफपी वृत्तसंस्थेने निप्रोपेत्रोव्स्क प्रदेशाच्या गव्हर्नरच्या हवाल्याने म्हटले आहे.
प्रत्यक्षात सोमवारीच अमेरिकेने युक्रेनला अधिक लष्करी मदत जाहीर केली होती. रॉकेट, दारुगोळा आणि इतर शस्त्रांचा सर्वात मोठा पुरवठा थेट युक्रेनच्या सशस्त्र दलांना अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून केला जाईल.