रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (10:18 IST)

पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन युद्ध तीन तास थांबवलं होतं - रविशंकर प्रसाद

ravi shankar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध 3 तास थांबवलं होतं असा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
 
भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून काढण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये तीन तास युद्धविराम झाला होता असा दावा रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे.
 
यापूर्वीही असा दावा करण्यात आला होता. केंद्र सरकारने हा दावा फेटाळला होता. 3 मार्च 2022 रोजी परराष्ट्र मंत्रालयान हा दावा फेटाळला होता.

रविशंकर प्रसाद म्हणाले, युद्ध शिगेला पोहचले असताना ही घटना घडली होती. पंतप्रधानांनी नेत्यांना सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यात येईल. त्यांनी केलेल्या चर्चेनंतर युद्ध तीन तास थांबवलं आणि विद्यार्थ्यांना परत आणलं.