शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (15:05 IST)

थायलंडमध्ये स्कूल बसला आग, विद्यार्थ्यांसह 25 जणांचा मृत्यू

fire
थायलंडमध्ये शाळेच्या बसला लागलेल्या आगीत विद्यार्थ्यांसह किमान 25 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी आहे.

फक्त अधिकारी आणि बचाव कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अपघातादरम्यान भाजल्याने अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे
 बसचे पुढील तयार फुटल्याने बस अनियंत्रित होऊन बसची डिव्हाइडरला धडक झाली आणि बसने पेट घेतला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आणि पीडितांना बाहेर काढण्यासाठी  स्थानिकांनी मदत केली. 
 
बस उथाई थानी येथील एका शाळेतून विद्यार्थ्यांना घेऊन सहलीला जात असताना बसला आग लागली.आगीत अनेक प्रवासी तरुण मरण पावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मध्य उथाई थानी प्रांतातून 44 प्रवाशांना शाळेच्या सहलीवर अयुथया येथे घेऊन जात असताना राजधानीच्या उत्तरेकडील उपनगरातील पाथुम थानी प्रांतात दुपारच्या सुमारास बसला आग लागली, असे परिवहन मंत्री सुरिया जुंगरुंगकित यांनी घटनास्थळी पत्रकारांना सांगितले.
Edited by - Priya Dixit