मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (12:59 IST)

छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी नाशिक येथून गोदावरीचे पवित्र जल

Environment Ministry gives nod to Shivaji statue on Arabian Sea
अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी नाशिक येथून गोदावरीचे पवित्र जल तसेच जिल्ह्यातील गड किल्ल्यांची माती मुंबईकडे पाठविण्यात आली.याकरिता विविध जिल्ह्यातील नद्यांचे जल आणि गड, किल्ल्यांची माती मागविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या वतीने रामकुंड येथे जलपूजन करण्यात येऊन जलकलशाची मिरवणूक काढण्यात आली.त्याच बरोबर राज्यातील जळगाव धुळे नंदुरबार अंग्पूर आणि अनेक महत्वाच्या जिल्हे येथून हे पवित्र जल आणि मृदा या पुजेकरिता पाठवली आहे. तर मुंबई येथे यासर्व माती आणि पाण्याचे पूजन होणार आहे.