मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (15:09 IST)

धक्कादायक ! 1 महिन्याच्या बाळाला ठेवलं ओव्हन मध्ये, मुलाचा मृत्यू

baby
मिसूरी मध्ये जन्मदात्या आईनेच मुलाला ओव्हन मध्ये ठेऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी महिलेला अटक केली असून ती हे अपघात असल्याचे म्हणत आहे. 
 
आई आणि मुलाचे नातेच काही वेगळे असते. मुलाला काहीही झालं तर आईला वेदना होतात.आई आपल्या बाळासाठी खुपच हळवी असते. आपल्या बाळाला कुठलाही प्रकारचा त्रास होताना तिला बघवत नाही. पण युनाइटेड स्टेट्स मध्ये मिसूरी येथे एका जन्मदात्या आईने चक्क आपल्या बाळाला चालत्या ओव्हन मध्ये ठेवले.

या प्रकारामुळे बाळाचा दुर्देवी अंत झाला. झरिया असे या चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. थॉमस असे या महिलेचे नाव आहे. तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊ या. 
मिळालेल्या माहितीनुसार, झरियाच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी थॉमस ने फोन करून दुपारी 1 वाजता त्यांना बोलावले. बाळाच्या बाबतीत काही चुकीचं घडले आहे लवकर घरी या असे ती म्हणाली.

घरी आल्यावर घरात धुराचा वास येत होता. झरिया पाळण्यात असून तिच्या शरीरावर भाजल्याच्या जखमा होत्या. कपडे आणि डायपर शरीराला चिकटून होते. बाजूला ब्लॅन्केट होते. झरियाला तातडीनं रुग्णालयात नेले असता ती खूप भाजली होती आणि तिला श्वास घेता येत नव्हते. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
झरियाची आई थॉमसच्या मैत्रिणीने सांगितले की, थॉमसची मानसिक स्थिती चांगली नाही कदाचित या मुळे तिने केलं असावे. कधी ती लहान मुलांप्रमाणे विचार करायची आणि तसेच वागायची . या घटनेमुळे मिसूरी हादरले आहे. 
 
 Edited By- Priya Dixit