सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (20:20 IST)

धक्कादायक !अमेरिकन हवाई दलाच्या उडत्या विमानातून तीन अफगाणी लोक पडले, देश सोडण्यासाठी टायरवर बसले

सोमवारी काबूल विमानतळावरून भयानक चित्रे समोर आली. लोक अफगाणिस्तान सोडण्यास इतके उत्सुक होते की ते उड्डाण करताना अमेरिकन हवाई दलाच्या विमानाच्या टायरवर बसले. विमानातून पडून तीन जणांचा दुर्देवी  अंत झाला.
 
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट पुन्हा प्रस्थापित झाल्यामुळे घाबरलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारे देश सोडून जायचे आहे. सोमवारी काबूल विमानतळावर याचे एक भयानक दृश्य पाहायला मिळाले. अमेरिकन हवाई दलाचे लष्करी विमान टेकऑफसाठी पुढे जात असताना, लोकांच्या गर्दीने धावपट्टीवर विमानाचा पाठलाग केला. विमान उड्डाण करण्यापूर्वी काही लोक टायर्स च्या वरच्या जागेवर चढून बसले. जेव्हा विमान उंचीवर पोहोचले तेव्हा लोकांचा तोल गेला. आकाशातून पडून तीन जणांचा मृत्यू झाला. नंतर त्यांचे मृतदेह घरांच्या छतावर सापडले. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की 60 देशांनी तालिबानला आवाहन केले आहे की ज्या नागरिकांना अफगाणिस्तानमध्ये राहायचे नाही त्यांना देश सोडण्याची परवानगी द्या.
 
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे अमेरिकेचे लष्करी विमान C17 होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक विमानाच्या च्या मध्यभागी असलेल्या जागेवर उभे राहून प्रवास करण्याचा प्रयत्न करत होते. पण, विमान हवेत पोहोचताच हे लोक एक एक करून खाली पडले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. काबूलमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये लूटमार आणि गोळीबाराच्या घटनाही घडत आहेत. विमानतळावर झालेल्या गोळीबारात आतापर्यंत पाच जण ठार झाले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत.
 
काबूल विमानतळावर विमानात चढण्यासाठी, बस स्थानक किंवा रेल्वे स्टेशनचा अनारक्षित डबा असल्याप्रमाणे गर्दी जमत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणखी एका व्हिडिओमध्ये विमानाजवळ जमलेल्या लोकांचा जमाव विमानाच्या धावपट्टीवर धावताना दिसत आहे.यासह, काही लोक विमानाच्या बाहेरील बाजूस बसलेले दिसत आहे.अशा परिस्थितीत कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
अफगाणिस्तान सध्या सत्ता परिवर्तनाच्या संकटाचा सामना करत आहे. तालिबानने येथे काबीज केले आहे आणि माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला आहे. रविवारी राजधानी काबूलमध्ये तालिबानच्या प्रवेशामुळे परिस्थिती बिघडली. तालिबानच्या भीतीमुळे लोकांना देश सोडण्याची घाई झाली होती आणि यामुळे राजधानी काबूलचे रस्ते देखील लोकांच्या गर्दी मुळे जाम झाले होते.