सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (16:24 IST)

विमानातून खाली पडले अफगाणी, हृदयद्रावक व्हिडिओ पहा

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. लोक देश सोडण्यासाठी विमानतळाकडे धाव घेत आहेत. विमानतळावर गर्दी उमटली आहे.
 
याचदरम्यान काबूल एयरपोर्टवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. काबूल विमानतळावरुन USAF's च्या C-17A या वाहतूक विमानाने उड्डाण केलं. अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी तरुण थेट विमानाच्या इंजिनवरच बसूनच लँडिंग गिअर पकडून होते. काबूलमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची ही धडपड होती. परंतु विमानाने उड्डाण करताच लँडिंग गिअर पकडलेले अनेक अफगाणी लोक हवेतून खाली पडले असल्याचं समजतं आहे.

विमानाने उड्डाण केल्यानंतर या विमानाच्या इंजिनावर चढलेल्या लोकांचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
 
नागरिकांची देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर एकच झुंबड उडाली आहे.