बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (16:49 IST)

भरधाव वेगाने जाणारी बस पलटी, 12 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

जगभरात रस्ते अपघाताच्या घटना वारंवार घडतात. रस्त्यावरील अपघात रोज कुठे ना कुठे घडतच असतात. दरवर्षी जगभरात रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू होतो. असाच एक अपघात आता इजिप्तमध्ये घडला आहे. सोमवारी इजिप्तच्या गलाला विद्यापीठातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ऐन सोखना महामार्गावर उलटली. इजिप्तच्या सुएझ गव्हर्नरेटमध्ये हा अपघात झाला
 
या बस अपघातात 33 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी १९ जणांना काही वेळातच घरी सोडण्यात आले. इतर काही विद्यार्थ्यांना रात्री डिस्चार्ज देण्यात आला तर काही अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

इजिप्तमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस कशी उलटली आणि अपघात झाला याचा तपास सुरु आहे. बस वेगाने असून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 
Edited By - Priya Dixit