शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (18:23 IST)

Spicejet Landing In Pakistan: स्पाईसजेटच्या विमानाचे पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग, विमान दिल्लीहून दुबईला जात होते.

spice jet
दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या एसजी-11 विमानाचे तांत्रिक बिघाडानंतर पाकिस्तानातील कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. अधिक माहिती यायची आहे. या घटनेची माहिती देताना स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, लाइटमधील तांत्रिक बिघाडामुळे स्पाईसजेटचे बी737 विमान कराचीच्या दिशेने वळवण्यात आले. विमान कराचीत सुखरूप उतरले आणि प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. प्रवक्त्याने पुढे सांगितले की लँडिंग दरम्यान कोणतीही आणीबाणी घोषित करण्यात आली नाही आणि विमानाचे लँडिंग सामान्य झाले. याआधी विमानात काही बिघाड झाल्याचे वृत्त नव्हते. प्रवाशांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. दुसरे विमान कराचीला पाठवले जात आहे जे प्रवाशांना दुबईला घेऊन जाईल.