गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2017 (16:39 IST)

स्टीफन हॉकिंगचे भाकित, येत्या १०० वर्षात मानवाला पृथ्वी सोडावी लागेल

येत्या १०० वर्षात मानवाला पृथ्वी सोडून एखाद्या दुसऱ्या ग्रहावर राहण्यासाठी जावे लागेल, असे भाकित ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे. हवामान बदल, उल्कापात आणि अतिलोकसंख्या यामुळे पृथ्वी भकास होईल. त्यामुळे काही वर्षात पृथ्वी मानवी वास्तव्यासाठी योग्य राहणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.त्यामुळे लवकरात लवकर मानवाला राहण्यासाठी नवीन ग्रह शोधावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

आपल्या हातात आता कमी वेळ राहिला आहे. लवकर हालचाली केल्या नाहीत, तर मोठा अनर्थ ओढावू शकतो. मानवाला परग्रहावर वास्तव्य करावेच लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जगभरात माणसाने केलेली प्रगतीच त्याच्यासाठी घातक ठरणार आहे, असेही हॉकिंग म्हणाले. माणसाचा वाढलेला वेग, आण्विक शक्ती आणि रासायनिक हल्ल्यांमुळे तर पृथ्वीचा विनाश आणखी जवळ येईल असा दावाही त्यांनी केला आहे.