शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (13:04 IST)

चीनचा प्रवास टाळण्याची सूचना

नॉव्हेल कोरोना व्हारसच संसर्गामुळे चीनमध्ये शंभराहून अधिक जणांनी प्राण गमावले असतानाच, चीनमध्ये प्रवास करणे टाळावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. घातक कोरोना व्हारसची आणखी 14 विमानतळांवर तपासणी सुरू करण्यात आली असून नेपाळ सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे. पुण्यातील 'एनआयव्ही' व्यतिरिक्त मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि अलेप्पी येथेही लाळ नमुन्यांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 
 
चीनमधील वुहान शहरात असलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया याआधीच सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवनयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. चीनमध्ये प्रवास करावा लागल्यास आपल आरोग्यावर सातत्याने देखरेख करावी, तसेच श्वसनाच्या या संसर्गासंबंधी काही शंका असल्यास 011-23978046 या 24 तासांच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.