गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 मार्च 2018 (16:02 IST)

इराक : बेपत्ता ३९ भारतीय मृत त्यांनी इस्लामिक स्टेटनं केली हत्या

sushma swaraj

आखाती देशातून अर्थात मोसुलमध्ये बेपत्ता असलेले सर्व म्हणजेच ३९ ठार झाले आहेत  अशी माहिती परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार  मृतदेहांचे ३९ पैंकी ३८  डीएनए सॅम्पल मॅच झाले आहेत. इस्लामिक स्टेटनंदहशतवादी संघटनेन   या सर्वांची हत्या करून त्यांचं दफन केले होते. या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए सॅम्पल त्यांना पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये पाठवले होते. या मध्ये  सर्वात अगोदर संदीप नावाच्या एका तरुणाचे सॅम्पल मॅच झाले आहे. निगृत  हत्या करण्यात आलेल्या सर्व भारतीयांचे मृतदेह अमृतसर एअरपोर्टला आणले जाणार आहेत. यामध्ये ३१ पंजाबचे, ४ हिमाचल आणि उरलेले इतर पश्चिम बंगाल-बिहारचे नागरिक आहेत. या प्रकरणात जनरल व्ही के सिंह मृतदेह भारतात आणण्यासाठी इराकला जाणार आहेत. विमानात हे मृतदेह आणले जातील ते अगोदर अमृतसर, त्यानंतर पाटना आणि कोलकाता जाणार आहेत.