बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (09:38 IST)

सुषमा स्वराज यांनी कॅन्सरग्रस्त मुलीला व्हिसा देण्याचे दिले आदेश

डोळ्याचा कॅन्सर झालेल्या पाकिस्तानातील एका पाच वर्षीय चिमुकलीला भारतात उपचार घेता यावेत, यासाठी तिला तातडीचा वैद्यकीय व्हिसा देण्यात यावा, असे आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांना दिले आहेत. या प्रकरणी या मुलीच्या पालकांनी स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती.
 
अनामता फारुख (वय ५) असे कॅन्सरग्रस्त चिमुकलीचे नाव आहे. तिला भारतातील रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत. मात्र, तिला तातडीचे उपचार मिळावेत यासाठी व्हिसाची अडचण निर्माण होत होती. त्यामुळे या चिमुकलीच्या पालकांनी स्वराज यांच्याकडे धाव घेतली आणि तातडीचा वैद्यकीय व्हिसा मिळावा, यासाठी विनंती केली होती. त्यानंतर स्वराज यांनी सोमवारी ट्विटरवरुन उच्चायुक्तांना तात्काळ व्हिसा देण्याचे आदेश दिले.