बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (17:05 IST)

पुणे : सुप्रियाताईनी दिली लिफ्ट

supriya sule

पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क आपल्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट दिली. बसच्या संपानं त्रस्त असलेल्या प्रवाशांना सुप्रिया सुळेंनी दिलेल्या लिफ्टमुळे आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी प्रवाशांनी एसटी संपाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. सकाळच्या वेळी सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी बस स्थानकावर प्रवाशांशीही त्यांनी बातचीत केली. त्यानंतर काही प्रवाशांना त्यांनी आपल्या गाडीतून लिफ्ट दिली.