बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (13:04 IST)

राहुल याच्याकडून चव्हाण यांचे स्पष्ट शब्दात कौतुक नाही

माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना चोवीस तास लागले. त्यांनी अभिनंदन केले; पण प्रदेश काँग्रेसच्या कामगिरीचे. चव्हाण यांचा स्पष्ट उल्लेख त्यांना टाळला आहे.

‘नांदेडमधील जबरदस्त कामगिरीबद्दल मी प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन करतो,’ असे त्यांनी म्हटले आहे. जरी चव्हाण खुद्द प्रदेशाध्यक्ष असले तरी राहुल यांनी नांदेडमधील कामगिरीचे श्रेय व्यक्तिगत पातळीवर थेट चव्हाणांना देण्याचे टाळले. त्यांना चव्हाणांचा उल्लेख केला नाही.