मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑक्टोबर 2017 (17:07 IST)

तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही :सुळे

supriya sule

‘ येत्या 1 जानेवारीपर्यंत कोपर्डी घटनेचा निकाल न लागल्यास मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य राष्ट्रीवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

‘कोपर्डी घटनेला दीड वर्ष होत आला मात्र अद्यापही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे आता आणखी उशीर झाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही.’ असं वक्तव्य करत हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. या प्रकरणाचा निकाल 1 वर्षाच्या आत लावला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, आतापर्यंत तरी याचा निकाल लागलेला नाही. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोपर्डीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.