शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (17:22 IST)

देशातील सर्वात श्रीमंत पक्ष 'भाजप'

असोसिएशन फॉर डेमोक्रॉटिक रिफॉर्म्स अँड इलेक्शन वॉचने (एडीआर) देशातील राजकीय पक्षांच्या संपत्तीची आकडेवारी जाहीर केली आहे. 2004-05 ते 2015-16 या काळात राजकीय पक्षांची संपत्ती किती वाढली, याबाबतची आकडेवारी एडीआरने जारी केली आहे.

देशातील सात राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या संपत्तीवरुन ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी, तृणमूल, भाकप, माकप यांचा समावेश आहे. यानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. भाजपशिवाय काँग्रेस, बसपा, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या सर्वच पक्षांची संपत्ती अनेक पटींनी वाढली आहे.