स्विस बॅंकेत भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट
स्विस बॅंकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट होत आल्याची सांगण्यात येत आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये स्विस बॅंकांमध्ये भारतीयांच्या केवळ 4 हजार 500 कोटी रुपयांच्याच ठेवी उरल्या आहेत. आधीच्या तुलनेत ही रक्कम निम्म्याने घटली आहे. काळ्या पैशाविरोधात मोदी सरकारकडून उचलण्यात येत असलेली कठोर पावले, तसेच स्विस बॅंकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे स्विस बॅंकेत भारतीयांनी ठेवलेला पैसा घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे स्विस बॅंकेमधील भारतीयांच्या ठेवी घटल्या असल्या तरी इतर देशांकडून ठेवण्यात येणाऱ्या रकमेचा आकडा वाढून 96 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 1987 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्विस बॅंकेच्या ठेवीमध्ये घट झालेली पाहायला मिळाली आहे.