सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (16:04 IST)

Tanya Pardazi : 21 वर्षीय टिकटॉक स्टार तान्या परदाजीचं निधन

death
टिकटॉक स्टार तान्या परदाजींचं स्कायडायविंग करताना अपघाती निधन झाले आहे. ती 21 वर्षाची होती. तिचे टिकटॉकवर एक लाख फॉलोअर्स होते. तिने मिस कॅनडा स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली होती. तान्या ही कॅनडातील टिकटॉकर आणि ब्युटी क्वीन होती. तिचे स्कायडायविंग करताना पॅराशूट उघडले नाही आणि ती जमिनीवर कोसळली आणि तिचा अपघाती  मृत्यू झाला. 
 
तिने तिच्या टिकटॉक अकाउंटवर मानसशास्त्र, एलियन, कलाशी निगडित व्हिडीओ शेअर केले आहे. तिचे 2 लाखाहून अधिक फालोअर्स आहे. तिच्या असामायिक निधनामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.