रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 2 जानेवारी 2021 (17:48 IST)

मुंबई हल्ल्याचा नेता झाकी उर रहमान लखवीला पाकिस्तानात अटक

लाहोर मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तैयबाचा कमांडर झाकी उर रहमान लखवी याला शनिवारी पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी अटक करण्यात आले. ही माहिती एका अधिकार्‍याने दिली.
 
2015 पासून मुंबई हल्ला प्रकरणात लखवी जामिनावर होता. त्याला दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) अटक केली. परंतु, अटक कोठून झाली हे सीटीडीने उघड केले नाही.
 
त्यात म्हटले आहे की, "सीटीडी पंजाबच्या गुप्तचर-आधारित कारवाईनंतर दहशतवादी कारवायांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या आरोपाखाली बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी झकी-उर-रहमान लखवीला अटक करण्यात आली."