1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 21 डिसेंबर 2020 (11:08 IST)

नव्या स्टेनचा ब्रिटनमध्ये उद्रेक; विमानसेवा तात्पुरती स्थगित : 30 डिसेंबरर्पंत पुन्हा लॉकडाउन

ब्रिटनमध्ये वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही नवीन प्रकारच्या कोरोना  विषाणूमुळे आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळेच ब्रिटन आणि युरोपियन देशांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागल्याने लंडन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लॉकडाउन लागू करण्याखत आले आहे. नेदरलँड्‌स आणि बेल्जिअमने ब्रिटनकडे जाणारी विमानसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. तर दुसरीकडे इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.
 
जर्मन सरकारने ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून रविवारी याबाबत माहितीदेण्यात आली तर दुसरीकडे कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता बेल्जिअम आणि नेदरलँडने यापूर्वीच ब्रिटनकडे जाणारी विमानसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. सध्या ब्रिटन घेत असलेल्या प्रत्येक निर्णावर आमचे लक्ष आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनशी निगडित सूचनांचा आणखी डेटा आम्ही मिळविण्यााचा प्रयत्न करत आहोत. जर्मनी अन्य युरोपिय देशांचही संपर्कात आहे. सध्या जर्मनीत नव्या स्टेनचा कोणताही रुग्ण सापडला नसल्याची  माहिती जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.