सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (23:05 IST)

तालिबानने अफूच्या लागवडीवर बंदी घातली, कायदा मोडल्यास तुरंगात पाठवणी

अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानने अफूच्या शेतीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. आजकाल संपूर्ण अफगाणिस्तानातील शेतकरी अफूसाठी शेत तयार करण्यात व्यस्त आहेत. अफगाण अफूपासून बनवलेले हेरॉईन जगभर पुरवले जाते.
 
तालिबानने शेतकऱ्यांना जारी केलेल्या आदेशात इशारा दिला आहे की, जर त्यांनी अफूच्या पिकाची लागवड केल्यास शेत जाळल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवले जाईल. ही बंदी 1990 च्या तालिबानची आठवण करून देणारी आहे. त्या काळी अफूच्या शेतीवरही बंदी होती. अफूच्या लागवडीवर तालिबानच्या बंदीला संयुक्त राष्ट्रांनी पुष्टी दिली आहे. 
 
यापूर्वी 2001 मध्ये देशातील शेतकऱ्यांनी अन्नधान्याची लागवड बंद केली होती. सततच्या युद्धामुळे देशातील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्याचं कारण होतं. मंडईत धान्य पोहोचणे अवघड झाले होते.
 
यानंतर अफू हा लहान शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत बनला. यातून ते एका महिन्यात तीन हजार रुपयांपर्यंत कमावत असे. आता अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश आहे. तालिबानची सत्ता येण्यापूर्वी ते वर्षाला 6000 टनांहून अधिक अफूचे उत्पादन करत होते. UN अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, त्यातून 320 टन शुद्ध हेरॉईन तयार होत होती.