रविवार, 25 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 11 डिसेंबर 2016 (20:21 IST)

तुर्कस्तानमध्ये फुटबॉल स्टेडियमबाहेर स्फोट

turkestan bomb blast
तुर्कस्तानातील सर्वात मोठे शहर असलेल्या इस्तानबूलमध्ये शनिवारी रात्री बेसिकतास फुटबॉल स्‍टेडि‍यमबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. हे दोन्ही स्फोट एका कारमध्ये झाले. प्राथमिक तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
– तुर्कस्तानचे गृहमंत्री सुलेमान सोल्यो यांच्यामते पहिला स्फोट स्टेडियमबाहेर झाला. तर दुसरा स्फोट मक्का पार्कजवळ झाला.
– रिपोर्ट्सनुसार दोन फुटबॉल क्लबदरम्यानचा सामना संपल्याच्या दोन तासांनंतर हा स्फोट झाला.
– तुर्कस्तानातील ब्रॉडकास्टर एनटिव्हीच्या मते, स्फोटात पोलिसांच्या एका दंगलविरोधी व्हॅनला टार्गेट करण्यात आले होते. सर्व प्रेक्षक गेल्यानंतर ही व्हॅन परत चालली होती.
– स्फोटात मृत पावणाऱ्यांमध्ये बहुतांश पोलिसांचा समावेश आहे. सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने मीडियाला घटनास्थवळ जाण्यास मनाई केली आहे.
– सध्या पोलिसांनी ब्लास्ट झालेली जागा सील केली आहे. वॉटर कॅननच्या मदतीने कारमध्ये लागलेली आग विझवण्यात आली आहे.
– ब्लास्टनंतर तुर्कस्तानचे राष्ट्रपती सपीर अर्दोगन यांनी ट्वीट करून घटनेचा निषेध केला. तसेच मृतांना श्रद्धांजलीही अर्पण केली.