1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. U S Air Force soldier dies after falling from approximately 170 feet

अमेरिकेत फुटबॉल सामन्यापूर्वी १७० फूट उंचीवरून पडून अमेरिकी हवाई दलाच्या सैनिकाचा मृत्यू

अमेरिकेतील सॅन अँटोनियो येथील अलामोडोम स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यापूर्वी फास्ट-रोप प्रात्यक्षिकादरम्यान अमेरिकी हवाई दलाचा एक सैनिक अंदाजे १७० फूट उंचीवरून पडून मरण पावला.
 
अमेरिकेतील सॅन अँटोनियो येथील अलामोडोम स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यापूर्वी लष्करी प्रात्यक्षिकादरम्यान अमेरिकी हवाई दलाच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. तो सैनिक अंदाजे १७० फूट उंचीवरून पडला. त्याला तात्काळ वैद्यकीय मदत देऊन रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृताची ओळख टेक्निकल सार्जंट इयान पॅटरसन अशी पटली आहे.
शनिवारी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट सॅन अँटोनियो (UTSA) आणि नेव्ही यांच्यातील फुटबॉल सामन्यापूर्वी आयोजित फास्ट-रोप प्रात्यक्षिकादरम्यान हा अपघात घडला. सशस्त्र दल आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या "सॅल्यूट टू आर्म्ड फोर्सेस अँड व्हेटरन्स" समारंभाचा हा एक भाग होता. चार लष्करी जवान प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते. इयान पॅटरसन दोरीच्या साहाय्याने खाली उतरत असताना त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते उंचीवरून खाली पडले. ते ६ व्या कॉम्बॅट ट्रेनिंग स्क्वाड्रनच्या डिटेचमेंट-२ या युनिटमध्ये नियुक्त होते आणि टॅक्टिकल एअर कंट्रोल पार्टी (TACP) प्रशिक्षक म्हणून काम करत होते. नेलिस एअर फोर्स बेसच्या माहितीनुसार, पॅटरसन मूळचे फोर्ट स्टीवर्ट, जॉर्जिया येथील होते आणि त्यांनी १५ वर्षे अमेरिकी हवाई दलात सेवा बजावली होती.
पुढील लेख
रेल्वे स्थानकांवर आता चक्क मिळणार किराणा! मध्य रेल्वेने स्थानकांवर किराणा किऑस्क सुरू केले